Join us  

Sumeet Pusavale : ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेत्यानं केलं प्री-वेडिंग फोटोशूट, पाहा रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 1:49 PM

1 / 10
कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच सुमीत पुसावळे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला.
2 / 10
सुमीतने सोशल मीडियावर साखरपुड्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता सुमीतने त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत.
3 / 10
मोनिका असं सुमीतच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे. मोनिका कमालीची सुंदर आहे.
4 / 10
सुमीत व मोनिकाने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये नुकतंच प्री-वेडिंग फोटोशूट केलं. सुमीत व मोनिकाने एकापेक्षा एक स्टायलिश पोझ दिल्या आहेत.
5 / 10
सुमित पूसावळे हा मूळचा दिघंजी गावचा. शालेय शिक्षणानंतर सुमित पुण्यात आला. इथे त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आणि काही काळ याच क्षेत्रात नोकरी केली.
6 / 10
सुमीतला स्वत:चं रेस्टॉरंट उभारायचं होतं. मात्र लहानपणापासूनच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानं त्याच्यात कलेची आवड निर्माण झाली.
7 / 10
मुंबईला गेल्यावर त्याला हिंदी चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. सरगम या चित्रपटातून तो झळकला होता.
8 / 10
त्यानंतर लागीरं झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून तो लाइमलाइटमध्ये आला.
9 / 10
2018 मध्ये त्याने ‘लागीरं झालं जी’या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही.
10 / 10
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत त्याने साकारलेली महाडिक राजे यांची भूमिकाही गाजली होती.
टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलंटिव्ही कलाकारमराठी अभिनेता