Join us  

Shweta Tiwari चं लाजणं पाहून फॅन्सची उडाली झोप, सेलिब्रिटी म्हणाले - सदा जवान लड़की

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 5:53 PM

1 / 6
भोजपुरी सिनेमा ते टीव्ही आणि मग सिनेमात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ४० पेक्षा जास्त वय असून सुद्धा श्वेता तिवारी तरूणींना लाजवेल इतकी सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.
2 / 6
श्वेता तिवारी नेहमीच सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंनी धुमाकूळ घालत असते. ती इतकी हॉट दिसते की तिची तरूण मुलगीही याबाबत मागे पडते. अनेक सेलिब्रिटी तिच्या फोटोंवर कमेंट्स करत असतात. राहुल वैद्यने तिच्या फोटोंवर कमेंट केली की, सदा जवान लडकी...
3 / 6
श्वेता तिवारी ही दोन मुलांची आई आहे. तिला एक मुलगी पलक तिवारी आणि रेआन नावाचा मुलगा आहे. दोन लग्नांनंतर ती मुलांसोबत एकटी राहते. आता तर मुलगी पलकही इंडस्ट्रीत नाव कमवत आहे. तिचे काही म्युझिक व्हिडीओ समोर आले आहेत. पण फॅन्स तिच्यापेक्षा जास्त श्वेताचं कौतुक करतात.
4 / 6
5 / 6
श्वेता तिवारी सध्या सिंगल आहे आणि ती तिचं हे स्टेटस खूप एन्जॉय करत आहे. श्वेताचं वैवाहिक जीवन नेहमीच समस्यांनी भरलेलं होतं. त्यामुळे तिने पुन्हा लग्न केलं नाही. ती एकटी मुलांचा सांभाळ करते. सध्या ती कुणासोबतही रिलेशनशिपमध्ये नाही.
6 / 6
टॅग्स :श्वेता तिवारीपलक तिवारी