Join us

आमिर खानने उभारली मराठमोळी गुढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 15:04 IST

मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. यावर्षी 'चला हवा येऊ द्या' मध्ये गुढीपाडवा आणि आमिर खानचा सहभाग हा योग जुळून ...

मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. यावर्षी 'चला हवा येऊ द्या' मध्ये गुढीपाडवा आणि आमिर खानचा सहभाग हा योग जुळून आला आणि या मंचावर आमिरने सपत्निक गुढी उभारत सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.एकंदरीत सामाजिक बांधिलकी जपणारे आणि लोकहितासाठी लोकसहभागाचं आवाहन करणारे आणि सोबतीला मनोरंजनही करणारे चला हवा येऊ द्याचे हे भाग लवकरच रसिकांना पाहता येणार आहे.अभिनेत्री श्रृती बुगडेसह थ्री इडियट सिनेमातले ''जुबी डुबी  ......जुबी डुबी'' आणि 'रंग दे बसंती' सिनेमातील 'अपनी तो पाठशाला'.....  या गाण्यावर ठेकाही धरल्याचे पाहायला मिळाले.वाढदिवसाच्या दिवशीच या मंचावर हजेरी लावल्यामुळे त्याचा 52 वाढदिवस त्याने चला हवा येऊ द्याच्या मंचावर साजरा केला.यावेळी सुपरहिट ठरलेला दंगल सिनेमावर आधारित एक कॉमेडी स्कीटही या मंचावर सादर करण्यात आले.