Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजना आल्या एकत्र, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 19:39 IST

1 / 7
'आई कुठे काय करते'मधील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिचा आज वाढदिवस आहे. संजना म्हणजेच रूपाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मधुराणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
2 / 7
रुपालीने इंस्टाग्रामवर दोघींचे फोटो शेअर करत मधुराणीला 'हॅपी बर्थडे' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुझा आजचा दिवस खास असेलच आणि येतं वर्ष तुझ्या आयुष्यात भरभराट घेऊन येवो... तुला खूप सारं प्रेम', असं कॅप्शन रूपालीने या फोटोला दिलं आहे.
3 / 7
मधुराणी गोखले आणि रूपाली भोसले या दोघी 'आई कुठे काय करते' या मालिकेत एकत्र काम करत आहेत.
4 / 7
मधुराणी अरूंधतीचं तर रूपाली संजना ही भूमिका साकारते आहे.
5 / 7
या दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
6 / 7
याआधीही रूपालीने या मालिकेच्या सेटवरचे फोटो शेअर केले होते.
7 / 7
रुपाली आणि मधुराणी यांच्या सोशल मीडियावरील फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिकारुपाली भोसले