Join us  

विराट कोहलीसोबतच्या त्या नात्यावर पहिल्यांदाच तमन्ना भाटिया झाली व्यक्त, म्हणाली, मी आणि तो...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 3:57 PM

1 / 10
तमन्ना भाटिया ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक अतिशय लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
तमन्नाच्या अभिनयापासून ते तिच्या अतिशय दर्जेदार अशा नृत्यापर्यंत तिची सर्वत्र वाहवा होताना दिसते. या अभिनेत्रीचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच लोकांना भुरळ पाडणारे आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
विजय वर्माच्या आधी तमन्नाचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं होतं. या यादीत क्रिकेटर विराट कोहलीचं ही नाव होतं. विराट आणि तमन्नाची भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती.(फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
नुकतेच एका मुलाखती दरम्यान तमन्नाने यावर खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, त्या जाहिरातदरम्यान मी विराटशी मोजून चार शब्द बोललो आणि त्यानंतर मात्र आम्ही कधीच भेटलो नाही किंवा बोललो. पण हो, माझ्या तो एक उत्तम को-स्टार आहे, असं मी आवर्जून सांगेन. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
तमन्नाचे नाव सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तमन्नाने अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. अभिनेत्रीने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
दरम्यान तमन्ना सध्या तिच्या लस्ट स्टोरीज २मध्ये किसिंग सीनमुळे चर्चेत आहे. तमन्नाने कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर ती कोणत्याही सिनेमात किसिंग सीन देणार नाही असा नियम तिने ठरवला होता. जवळपास १८ वर्षांनी तिने तो तोडला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
तमन्नाने या सीरिजमध्ये अभिनेता आणि तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा याच्यासोबत लीप लॉक केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
'मी आजवर कधीही इंटिमेट सीन दिले नाहीत तरीदेखील या भूमिकेसाठी सुजॉय घोष यांनी माझी निवड केली याचं मला खूप कौतुक आहे. पडद्यावर मला रोमान्स करताना प्रेक्षकांना नक्कीच संकोचल्यासारखं वाटलं असं मला वाटायचं. म्हणून मी किसिंग सीन न देण्याचा निर्णय घेतला होता', असं तमन्ना म्हणाली. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
दरम्यान, 'लस्ट स्टोरीज २'मध्ये केवळ कथेची गरज म्हणून मी ते सीन दिले, असंही तिने सांगितलं. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :तमन्ना भाटियाविराट कोहली