Join us  

चार मुली जन्म घेऊ शकल्या नाहीत..., सरोगसीचा अनुभव सांगताना भावुक झाली सनी लिओनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 6:14 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तीन मुलांची आई आहे. होय, सरोगसीद्वारे सनीने दोन जुळ्यांना जन्म दिला आणि एका मुलीला दत्तक घेतलं. पण त्याआधी सनीने चार मुलींना गमावलं. सरोगसी प्रक्रियेदरम्यान चार मुली जन्म घेऊ शकल्या नाहीत.
2 / 7
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सनी सरोगसीच्या अनुभवाबद्दल बोलली. हा अनुभव सांगताना सनी अनेकदा भावुक झाली.
3 / 7
आम्ही दोन जुळ्या मुलांना सरोगसीद्वारे जन्म दिला. पण त्याआधीही आम्ही यासाठी बराच प्रयत्न केला होता. एक वेळ अशी आली होती की मी आतून खचले होते, असं सनी म्हणाली.
4 / 7
तिने सांगितलं, आम्ही सरोगसीद्वारे मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे सहा एग्ज होते. यापैकी चार एग्ज मुलीची आणि दोन मुलाची होती. अमेरिकेत मुलगा की मुलगी हे सांगतात. आम्ही आयव्हीएफ केलं. पण ते मुलींचे एग्ज वाचू शकले नाही. त्यातून बेबी जन्म घेऊ शकल्या नाहीत.
5 / 7
पुढे ती म्हणाली, सरोगसीचा हा अनुभव खूप वेदनादायी होता. मी अपसेट झाले होते. अखेर आम्ही मुलं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि निशाला दत्तक घेतलं. खूप मोठी कागदोपत्री प्रक्रिया पार पाडून निशा आमच्या घरी आली आणि याचदरम्यान आम्हाला आणखी एक गुड न्यूज मिळाली.
6 / 7
आयव्हीएफद्वारे आम्हाला दोन जुळी मुलं झालीत आणि मी व डॅनिएल तीन मुलांचे आईबाबा बनलोत. ही सगळी देवाची किमया आहे. आमच कुटुंब आता पूर्ण झालं आहे, असंही ती म्हणाली.
7 / 7
निशा, नोहा व अशर या तिन्ही मुलांसोबतचे अनेक फोटो सनी सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यांच्यासोबत धम्माल मस्ती करतानाचे व्हिडीओही ती शेअर करते.
टॅग्स :सनी लियोनीबॉलिवूड