Join us  

Star Kids : नवीन वर्षात एक - दोन नाही तर १० स्टार किड्स करणारेत बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पाहा कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 6:00 AM

1 / 10
Suhana Khan: शाहरुख खान २०२३ मध्ये दीर्घ कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करतो आहे. तर दुसरीकडे त्याची लाडकी लेक सुहाना देखील बॉलिवूडमधील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. त्याच्या आर्चीजचे शूटिंग पूर्ण झाले असून ते पुढील वर्षी रिलीज होणार आहे. म्हणजेच शाहरुख आणि सुहाना दोघांसाठी २०२३ खूप खास असणार आहे.
2 / 10
Khushi Kapoor : सोनम आणि जान्हवी कपूरनंतर आता या कुटुंबातील आणखी एक महिला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ती दुसरी कोणी नसून बोनी कपूरची छोटी लाडकी लेक खुशी कपूर आहे. जी 2023 मध्ये रिलीज होणार्‍या झोया अख्तरच्या आर्चीज चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहे.
3 / 10
Agastya Nanda : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशी अटकळ बांधली जात होती पण घडलं वेगळंच. नव्याने जिथे बिझनेसमध्ये प्रवेश केला, तिथे तिचा भाऊ अगस्त्य नंदाने अभिनयाचा मार्ग स्वीकारला. तो झोया अख्तरच्या आर्चिजचाही एक भाग आहे. जो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
4 / 10
Shanaya Kapoor : सोनम, जान्हवी आणि खुशीची चुलत बहीण शनाया कपूरचा डेब्यू चित्रपटही पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. ज्याचे शीर्षक आणि पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. बेधडक या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणारी शनाया तिच्या स्टाईल आणि सौंदर्यामुळे चर्चेत येत असते.
5 / 10
Ibrahim Ali Khan : सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या इब्राहिम अली खानने आता अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला आहे. करण जोहरच्या चित्रपटातून तो २०२३ मध्ये डेब्यू करणार आहे. सध्या तरी या चित्रपटाबाबत फारशी माहिती देण्यात आलेली नाही.
6 / 10
Alizeh Agnihotri : अलिझेह अग्निहोत्री ही सलमान खानची भाची आहे, जी तिच्या सौंदर्यामुळे आधीच चर्चेत आहे. त्याचवेळी, ती सूरज बडजात्याच्या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे, ज्याची घोषणा नुकतीच झाली.
7 / 10
Pashmina Roshan : पश्मिना रोशन ही हृतिक रोशनची चुलत बहीण आहे, जिच्या नावाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. या वर्षी ती इश्क विश्क रिबाउंडमध्ये दिसणार आहे जो २००३च्या इश्क विश्कचा सिक्वेल आहे. सध्या पश्मिना कार्तिक आर्यनसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.
8 / 10
Palak Tiwari : ज्या क्षणाची पलक तिवारी खूप दिवसांपासून वाट पाहत होती, ती संधी तिला २०२२ मध्ये मिळाली. तिचा पहिला चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्याबद्दल ती खूप उत्सुक आहे.
9 / 10
Junaid Khan : आमिर खान आणि रीना दत्ताचा मुलगा जुनैद खान वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराजा या पिरियड चित्रपटातून पदार्पण करणार आहे. जो २०२३ मध्येच रिलीज होऊ शकते. या चित्रपटात त्याच्यासोबत शर्वरी वाघ, शालिनी पांडे आणि जयदीप अहलावत देखील असणार आहेत.
10 / 10
Rajveer Deol : अभिनेता सनी देओलचा दुसरा मुलगा राजवीर देओलही २०२३ मध्ये डेब्यू करणार आहे. सूरज बडजात्याच्या चित्रपटात अलिझेह अग्निहोत्रीसोबत तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही नवोदित कलाकारांची जोडी रोमँटिक जॉनरच्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
टॅग्स :सुहाना खानशनाया कपूरपलक तिवारीखुशी कपूरइब्राहिम अली खान