३६० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे साउथचा ‘हा’ सुपरस्टार; १०० कोटींच्या बंगल्यात राहतो, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST
साउथचा सुपरस्टार अलू अर्जुन त्याच्या आगामी ‘ना पेरू सूर्या ना इल्लू इंडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला असून, त्यामध्ये तो अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. या चित्रपटात अलू भारतीय सैनिकाच्या भूमिकेत असून, अतिशय डॅशिंग अशा अंदाजात तो बघावयास मिळत आहे. अलूला साउथचा सुपरस्टर म्हणून संबोधले जात असून, एक चित्रपटासाठी तो १६ ते १८ कोटी रुपये चार्ज करतो. तो त्याच्या लॅविश लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे सुमारे ३६० कोटी रुपयांची संपत्ती असून, १०० कोटी रुपयांच्या महालात तो राहतो.
३६० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे साउथचा ‘हा’ सुपरस्टार; १०० कोटींच्या बंगल्यात राहतो, पाहा फोटो!
साउथचा सुपरस्टार अलू अर्जुन त्याच्या आगामी ‘ना पेरू सूर्या ना इल्लू इंडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला असून, त्यामध्ये तो अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. या चित्रपटात अलू भारतीय सैनिकाच्या भूमिकेत असून, अतिशय डॅशिंग अशा अंदाजात तो बघावयास मिळत आहे. अलूला साउथचा सुपरस्टर म्हणून संबोधले जात असून, एक चित्रपटासाठी तो १६ ते १८ कोटी रुपये चार्ज करतो. तो त्याच्या लॅविश लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे सुमारे ३६० कोटी रुपयांची संपत्ती असून, १०० कोटी रुपयांच्या महालात तो राहतो. अलू अर्जूनच्या हैदराबादस्थित बंगल्याची किंमत शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. जुबली हिल्स स्थित आपल्या घराला अलूने लोकप्रिय इंटेरिअर डिझायनर आमीर आणि हामिदा यांनी डेकोरेट केले आहे. आमीर आणि हामिदाने अलू आणि त्याच्या पत्नीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन घर डिझाइन केले आहे. यासाठी या दांपत्याने त्यांना त्यांच्या दोन आवडी सांगितल्या होत्या. एक तर घर बॉक्स शेपमध्ये असायला हवे, तर दुसरे जास्त डिझाइन केलेले नसावे. बाहेरून हे घर भलेही एखाद्या बॉक्ससारखे दिसत असले तरी, याचे इंटेरिअर बघण्यासारखे आहे. घराच्या आतमध्ये सुंदर कॉरिडोर आहे, जो लिव्हिंग स्पेसकडे जातो. तसेच लिव्हिंग रूम, डायनिंग, किचन ते बार काउंटर आदी सुविधा घरात उपलब्ध आहेत. दरम्यान, अलू अर्जुन याच्या आगामी चित्रपटाचे टीजर शाहरुख खानच्या झिरो या चित्रपटाच्या टीजरबरोबरच रिलीज करण्यात आल्याने यू-ट्यूबवर दोन्ही चित्रपटांचा चांगलाच सामना बघावयास मिळत आहे.