Join us  

IN PICS : दोन कोटींची जाहिरात फक्त हिचं नाकारू शकते...! साई पल्लवीची बातचं न्यारी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 8:00 AM

1 / 10
साई पल्लवी ही दक्षिणेची लोकप्रिय अभिनेत्री. तिची वेगळी ओळख करून देण्याची तशीही गरज नाही.
2 / 10
केवळ पैशांना महत्त्व देणाऱ्या आणि तत्त्वांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या कलाकारांच्या भाऊगर्दीत साई पल्लवी वेगळी ठरते. दोन कोटींची जाहिरात फक्त तिच नाकारू शकते.
3 / 10
होय, काही वर्षांआधी साईला एका फेअरनेस क्रिमची जाहिरात ऑफर झाली होती. काही मिनिटांच्या या जाहिरातीसाठी तिला 2 कोटी मिळणार होते. पण साईने ही ऑफर धुडकावून लावली.
4 / 10
केवळ पैशांसाठी फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यास तिने नकार दिला. मी कधीच सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात करत नाही. मला ते मान्यच नाही. तुम्ही जसे असाल तसे स्वत:ला स्वीकारा, जग तुम्हाला आपोआप स्वीकारले, असं ती म्हणते.
5 / 10
साई पल्लवी ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कमीतकमी मेकअपसह किंवा मेकअपशिवाय ऑन-स्क्रीन दिसते. पहिल्याच सिनेमात ती नो मेकअप लुकमध्ये दिसली होती. यालाही धैर्य लागतं.
6 / 10
साई पल्लवी हिने 2015 मध्ये प्रेमम या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिलं.
7 / 10
पहिल्या चित्रपटानंतर साई एका रात्रीत स्टार झाली. पण हे स्टारडम डोक्यात जाऊ न देता तिने तिचे एमबीबीएस पूर्ण केलं. म्हणजे ती डॉक्टर बनली.
8 / 10
यानंतर आलेले अथिरन, मारी 2 हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली.
9 / 10
साई पल्लवीचे पूर्ण नाव साई पल्लवी सेंथामराय आहे, तिचा जन्म 9 मे 1992 रोजी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील बडगा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सेंथामराय कन्नन आणि आईचे नाव राधा आहे. तिला पूजा नावाची एक लहान बहीणही आहे.
10 / 10
साई पल्लवी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. आता तत्त्वांसाठी जगणारी अभिनेत्री अशी तिची आणखी एक ओळख निर्माण झाली आहे.
टॅग्स :साई पल्लवी