श्रुती हासन बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST
अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या बॉयफ्रेंडमुळे चांगलीच चर्चेत आहे. लवकरच ती त्याच्यासोबत लग्न करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघे मुंबईमध्ये बघावयास मिळाले.
श्रुती हासन बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट, पाहा फोटो!
अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या बॉयफ्रेंडमुळे चांगलीच चर्चेत आहे. लवकरच ती त्याच्यासोबत लग्न करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघे मुंबईमध्ये बघावयास मिळाले. गेल्या काही दिवसांपासून श्रुती तिच्या बॉयफ्रेंडमुळे चांगलीच चर्चेत आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. श्रुती तिचा कथित बॉयफ्रेंड मायकल कॉरसेल याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बघावयास मिळत आहे. या दोघांच्या लग्नाला श्रुतीचे वडील कमल हासन यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. श्रुती अखेरीस ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. तिच्यासोबत राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होता. काही दिवसांपूर्वीच श्रुती बॉयफ्रेंडसोबत विमानतळावर दिसली होती. सुट्या एन्जॉय करण्यासाठी ती विदेशात जात होती. सध्या श्रुतीचे वडील कमल हासन राजकारणात नशीब आजमावत आहेत. श्रुती हासन बॉयफ्रेंड मायकल कॉरसेलसोबत.