Join us  

लेकीच्या लव्हस्टोरीत शक्ती कपूरच 'व्हिलन'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरून श्रद्धाला आणलं होतं खेचून...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 4:53 PM

1 / 8
बॉलिवूडमध्ये लिंक-अप, पॅच-अप अन् ब्रेकअप च्या चर्चा सुरुच असतात. कधी कोणाची जोडी जमेल तर कधी कोणाचं ब्रेकअप होईल सांगता येत नाही. माग अगदी १५ वर्षांचे लग्नही इथे सहजासहजी तुटते.
2 / 8
काही वर्षांपूर्वी अशीच एक चर्चा होती ती म्हणजे आशिकी गर्ल 'श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरची'. दोघंही 'रॉकऑन २ सिनेमाच्या शूटिंगवेळी एकमेकांच्या प्रेमात पडले.
3 / 8
श्रद्धा-फरहान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत तर लवकरच श्रद्धा फरहानच्या घरी शिफ्ट होणार आहे. दोघंही लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये राहणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र या प्रेमात अडथळा ठरले ते बॉलिवूडचे खलनायक आणि श्रद्धाचे वडील शक्ती कपूर.
4 / 8
शक्ती कपूर यांना श्रद्धा आणि फरहानचं हे नातं अजिबातच मान्य नव्हतं. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे आणि शक्ती कपूर अचानक फरहानच्या घरी धडकले होते. काही दिवसांपासून श्रद्धा तिथे राहत असल्याची कुणकुण त्यांना लागली होती.
5 / 8
श्रद्धाला तिथे पाहताच तिला सरळ फरहानच्या घरातून खेचून घेऊन गेले अशा चर्चा रंगल्या. कोणताही तमाशा व्हायला नको म्हणून श्रद्धाही चुपचाप बाहेर वडील आणि मावशीसोबत गेली. मात्र नंतर कपूर कुटुंबाने सर्व चर्चा फेटाळून लावल्या. तरी श्रद्धा आणि फरहानचं नातं होतं हे जगजाहीर आहे.
6 / 8
खरंतर दोघांच्याही वयात खूप जास्त अंतर होतं. फरहान श्रद्धाहून तब्बल १३ वर्षांनी मोठा होता. हे सुद्धा शक्ती कपूर यांच्या नकारामागचं कारण ठरलं. म्हणूनच स्वत: शक्ती कपूरच लेकीच्या लव्हस्टोरीतील व्हिलन बनले.
7 / 8
तर दुसरीकडे फरहान अख्तर आणि पत्नी अधुना यांचा 17 वर्षांचा संसार मोडला. त्यांच्यातील घटस्फोटाचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र फरहान अख्तरच्या अफेअरच्या चर्चांमुळेच त्यांच्यात बिनसलं आणि दोघंही वेगळे झाले. यानंतर २०२२ मध्ये फरहानने शिबानी दांडेकरसोबत लग्नगाठ बांधली.
8 / 8
श्रद्धा कपूरचं प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबत नाव जोडलं गेलं. मात्र श्रद्धाने कधीच यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र काही महिन्यांपूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाल्याचं वृत्त आलं.
टॅग्स :श्रद्धा कपूरशक्ती कपूरफरहान अख्तरदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट