Join us  

OMG!! शहनाजने सर्वांसमोर सलमानला मारली घट्ट मिठी, बाजूला उभ्या शेराची रिअ‍ॅक्शन बघितली?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 3:31 PM

1 / 8
शहनाज गिल जिथे जाईल, तिथे तिची चर्चा होते. काल ती अर्पिता खानच्या ईद पार्टीला पोहोचली. मग काय, इथेही तिचीच चर्चा झाली.
2 / 8
खुद्द भाईजान सलमान खान या पंजाबच्या कतरिना कैफचे सगळे लाड पुरवताना दिसला. यावेळी दोघांचीही क्यूट बॉन्डिंग दिसून आली.
3 / 8
आली तशी शहनाजनं सलमान कडकडून मिठी मारली, त्याला किस केलं. याचे फोटो व्हायरल झालेत आणि सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली.
4 / 8
काहींना शहनाजचा क्यूट अंदाज आवडला. पण काहींनी यावरून तिला ट्रोल केलं. काहींनी भाईजानचा बॉडीगार्ड शेराची रिअ‍ॅक्शन पाहून तिची खिल्ली उडवली.
5 / 8
शहनाज व सलमान पापाराझींना पोझ देत असताना भाईजानच्या मागे उभा असलेला शेरा त्या दोघांकडे टक लावून बघत होतो. काहीशा गंभीर चेह-यानं तो उभा दिसला. लोकांनी यावरून मजा घेतली.
6 / 8
शेराला शहनाजचे इरादे काही पटलेले दिसत नाहीत, अशी कमेंट अनेक युजर्सनी यावर केली. अरे शेराकडे जरा बघा, म्हणत अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या.
7 / 8
काही युजर्सनी शहनाजला ट्रोल केलं. अरे सलमानला किती चिपकणार, या मुलीला आत्मसन्मान आहे की नाही, असं एका युजरने तिला ट्रोल करताना लिहिलं.
8 / 8
सांभाळ स्वत:ला सना..., अरे ही काय करतेय? मस्करी एका मर्यादेपर्यंतच बरी वाटते, अशा कमेंट्सही अनेकांनी केल्या.काहींना मात्र शहनाज व सलमानची बॉन्डिंग चांगलीच आवडली. अनेकांनी शहनाजला क्यूट, कूल म्हणत, तिचं कौतुक केलं.
टॅग्स :सलमान खानशेहनाझ गिलअर्पिता खानईद ए मिलादबॉलिवूड