Join us

‘देसी गर्ल’साठी सर्व सीमा पार करीत आहे तिचा दहा वर्षांनी लहान असलेला विदेशी बॉयफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 21:32 IST

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या तिच्या विदेशी बॉयफ्रेंडमुळे भलतीच चर्चेत आहे. होय, आम्ही अभिनेत्री प्रियांका चोप्राविषयी सांगत आहोत. गेल्या काही ...

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या तिच्या विदेशी बॉयफ्रेंडमुळे भलतीच चर्चेत आहे. होय, आम्ही अभिनेत्री प्रियांका चोप्राविषयी सांगत आहोत. गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निक जोनस याच्याशी तिचे नाव जोडले जात आहे, तर प्रियांकाकडून अद्यापपर्यंत तिच्या या रिलेशनबद्दल कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य समोर आले नाही. गेल्या आठवड्यात प्रियांकाला निकच्या कजिनच्या लग्नातही बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची केमिस्ट्री बघावयास मिळाली. हॉलिवूडलाइफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार, प्रियांकापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेला निक प्रियांकाच्या प्रेमात असा काही वेडा झाला आहे की, तो तिच्यापासून एक क्षणही दूर राहत नाही. त्याला कुठल्याही परिस्थितीत तिला दूर करायचे नाही. निकला त्याच्या करिअरबरोबर एक सुंदर पत्नीही हवी आहे. त्याला लवकरच त्याच्या आयुष्यात नव्या नात्यांची एंट्री करून घ्यायची आहे. निकला वाटते की, प्रियांकाच त्याच्या आयुष्यातील ती महत्त्वाची मुलगी आहे. वृत्तानुसार, प्रियांकाला खूश ठेवण्यासाठी निक काहीही करण्यास तयार आहे. जेव्हा-जेव्हा हे दोघे बाहेर जातात तेव्हा-तेव्हा निक केवळ प्रियांकाच्या डोळ्यात बघत असतो. असे करून निक प्रियांकाला हे सांगू इच्छितो की, त्याच्यासाठी ती जगातील सर्वांत सुंदर मुलगी आहे. उपलब्ध माहितीनुसार, निकने त्याच्या मोबाइलचे स्क्रीन सेव्हर बदलून त्याठिकाणी प्रियांका आणि त्याचा फोटो ठेवला आहे. निकने त्याच्या मोबाइलमध्ये एक स्पेशन टोनही सेट केली आहे. जेव्हा प्रियांका त्याला कॉल करते तेव्हा ती रिंगटोन वाजते.