Join us  

अभिनयाव्यतिरिक्त 'हे' मराठी कलाकार करतात साईड बिझनेस; जाणून घ्या त्यांच्या ब्रँडविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:50 AM

1 / 7
कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे उत्तम कलाकार असण्यासोबतच एक प्रसिद्ध व्यावसायिकदेखील आहेत. त्यामुळेच कलाविश्वाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात काम करणारे कलाकार कोणते आणि त्यांचे साईड बिझनेस कोणते ते पाहुयात.
2 / 7
प्रिया बेर्डे - अशी ही बनवाबनवी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे. असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या प्रिया बेर्डे यांचं स्वत:चं हॉटेल आहे. मराठमोळा झटका असं त्यांच्या हॉटेलचं नाव आहे.
3 / 7
अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित- मराठी कलाविश्वातील या दोन दिग्गज अभिनेत्रींचा स्वतंत्र एक ब्रँड आहे. तेजाज्ञा असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. या ब्रँड अंतर्गत या दोघी जणी डिझायनर कपडे तयार करतात. दोघींच्या नावावरुन या ब्रँडचं नाव तेजाज्ञा असं ठेवण्यात आलं आहे.
4 / 7
यशोमन आपटे - श्रीमंता घरची सून या मालिकेत झळकलेल्या यशोमन आपटे याने अलिकडेच त्याचं कॅफे सुरु केलं आहे. कॅप्टन कूल असं त्याच्या कॅफेचं नाव आहे.
5 / 7
शशांक केतकर - अभिनेता शशांक केतकर यांचं पुण्यात आईच्या गावात हे हॉटेल आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून त्याचं हॉटेल सुरु असून हॉटेल व्यवसाय सुरु करावा अशी त्याची इच्छा होती. अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. मात्र, काही कारणास्तव हे हॉटेल बंद करावं लागल्याचं म्हटलं जातं.
6 / 7
शंतनू मोघे - आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शंतनू मोघे. मालिकेत अरुंधतीच्या दिराची भूमिका साकारणारा शंतनू अभिनेता असण्यासोबतच एक हॉटेल व्यावसायिकदेखील आहे. द बॉम्बे फ्राईज या नावाने त्याचा कॅफे आहे. या कॅफेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फ्राइज आणि कॉफीचे प्रकार मिळतात.
7 / 7
निवेदिता सराफ - प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आणि अशोक सराफ यांची पत्नी म्हणजे निवेदिता सराफ. अग्गंबाई सासूबाई या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळवणाऱ्या निवेदिता सराफ यांचा साड्यांचा ब्रँड आहे. हंसगामिनी असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. या ब्रँड अंतर्गत त्या स्वत: साड्या डिझाइन करतात.
टॅग्स :सेलिब्रिटीनिवेदिता सराफटेलिव्हिजनतेजस्विनी पंडितशंतून मोघे