SEE PICS : हातात हात घालून रॅम्पवर उतरलेत ‘एक्स लव्हबर्ड्स’ दीपिका पादुकोण-रणबीर कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 10:20 IST
एक्स-लव्हबर्ड्स दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार, यावरून गेल्या काही दिवसांत चर्चांना ऊत आला होता. पण ही बातमी ...
SEE PICS : हातात हात घालून रॅम्पवर उतरलेत ‘एक्स लव्हबर्ड्स’ दीपिका पादुकोण-रणबीर कपूर!
एक्स-लव्हबर्ड्स दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर एकत्र दिसणार, यावरून गेल्या काही दिवसांत चर्चांना ऊत आला होता. पण ही बातमी अखेर खरी ठरली आणि ‘मिजवां2018’मध्ये दीपिका व रणबीर एकत्र आलेत. तेही अगदी हातात हात घालून. साहजिकच सगळ्यांच्या नजरा या एक्स लव्हबर्ड्सवर खिळल्या. दोघेही हातात हात घेत रॅम्पवर आलेत, तो क्षण या जोडीच्या चाहत्यांना मनापासून सुखावून गेला. दरवर्षी आयोजित होणाºया ‘मिजवां2018’ची यंदाची थिम होती चिकनची कारगिरी केलेली वस्त्रप्रावरणे. अशाच चंदेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका पादुकोण रॅम्पवर अवतरली. रणबीरने ब्लॅक कलरचा कोट घातलेला होता. यावर व्हाईट रंगाने चिकनची कारगिरी केली गेली होती. ‘मिजवां2018’मध्ये रणबीर व दीपिका दोघांनीही फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रासाठी शो स्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरले. शबाना आझमीद्वारा आयोजित या इव्हेंटमध्ये रणबीर व दीपिका या जोडीचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. ALSO READ : 'या' व्यक्तिसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण येणार एकत्र! रणबीर व दीपिकाची लव्हस्टोरी कुणापासूनही लपलेली नाही. एकेकाळी दीपिका व रणबीर रिलेशनशिपमध्ये होते. विशेषत: दीपिका रणबीरमध्ये प्रचंड गुंतली होती. पण रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफ आली आणि रणबीर दीपिकापासून दूर झाला. या काळात दीपिका डिप्रेशनमध्येही गेली होती. हे ब्रेकअप पचवणे तिला बरेच कठीण झाले. पण कालांतराने ती यातून बाहेर पडली. तिकडे रणबीर व कॅटरिनाचेही ब्रेकअप झाले. रणबीर पुन्हा सिंगल झाला. पण आता दीपिका सिंगल नव्हती. रणवीर सिंगच्या रूपात दीपिकाला एक सच्चा बॉयफ्रेन्ड मिळाला. आताश: दीपिका व रणबीर यांच्यात काहीही नाही, आहे ती केवळ निखळ मैत्री. दोघांमधील बॉन्ड आजही कायम आहे. ‘मिजवां2018’च्या रॅम्पवरही दोघांमधील हे बॉन्डिंग दिसले. तुम्हीही पाहा आणि या एक्स-लव्हबर्ड्सच्या बॉन्डिंगबद्दल काय वाटते, ते आम्हाला जरूर कळवा.