Join us  

ओम नम: शिवाय! कपाळी गंध, गळ्यात भगवं उपरणं... अशी आहे साराची 'शिवभक्ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 12:46 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान महादेवाची भक्त आहे हे फार कमी जणांना माहित असेल. ती नेहमीच शंकराच्या मंदिरातील दर्शनाचे फोटो शेअर करत असते.
2 / 7
काल महाशिवरात्रीनिमित्त तिने पोस्ट केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जय भोलेनाथ असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.
3 / 7
साराने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर जय भीमाशंकर असं लिहिलेलं एक वस्त्रही तिने गळ्यात घातलं आहे. अतिशय मनोभक्तिभावे ती प्रार्थना करताना दिसत आहे.
4 / 7
कपाळावर चंदन लावलेला फोटोही तिने पोस्ट केला आहे. तिच्या हावभावावरुनच कळते की तिची महादेवावर प्रचंड भक्ती आहे.
5 / 7
साराचा बॉलिवूडमधील पहिला सिनेमाही 'केदारनाथ'होता. ती अजुनही अनेकदा दर्शनासाठी केदारनाथला जाते.
6 / 7
याशिवाय इतर ठिकाणचेही तिचे तीर्थस्थळावरील फोटो सोशल मीडियावर दिसतात.साराची महादेवावरील भक्ती पाहून नेटकरीही तिचे कौतुक करत आहेत. हेच भारत देशाचं सौंदर्य आणि खरी ओळख आहे.
7 / 7
साराची आई अमृता सिंग तर वडील सैफ अली खान आहेत. मात्र सारा आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान हे आईजवळच लहानाचे मोठे झाले आहेत. साराची लहानपणापासूनच महादेवाप्रती श्रद्धा आहे.
टॅग्स :सारा अली खानमहाशिवरात्रीव्हायरल फोटोज्सोशल मीडिया