Join us

१२ वर्षांत इतकी बदलली सलमान खानची ही हिरोईन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST

होय, सलमान खानसोबत ‘लकी’मध्ये दिसलेली स्रेहा उल्लाल गत १२ वर्षांत कमालीची बदलली आहे. आज (२० डिसेंबर) स्रेहाचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही लेटेस्ट फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

होय, सलमान खानसोबत ‘लकी’मध्ये दिसलेली स्रेहा उल्लाल गत १२ वर्षांत कमालीची बदलली आहे. आज (२० डिसेंबर) स्रेहाचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही लेटेस्ट फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.२००५ मध्ये स्रेहाला सलमानसोबत ब्रेक मिळाला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि तसा स्रेहाच्या करिअरलाही ब्रेक लागला.पण आता ३० वर्षांची स्रेहा पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर परतणार आहे.फेसबुकवर आज तिने याची घोषणा केली. आज वाढदिवसाला एक सरप्राईज...वैशाली बनून आयुष्यमानभवमधून तुमचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे,असे तिने लिहिलेय.स्रेहाने अनेक भाषांच्या चित्रपटांत काम केले. पण अद्याप तिला म्हणावे तसे यश मिळवता आले नाही.गेल्या चार वर्षांत स्नेहाला एका आजाराने ग्रासले होते. यात ती न अधिक चालू शकत होती, ना अधिक वेळ उभी राहू शकत होती. स्नेहा आॅटोइम्यून डिसआॅर्डरने पीडित होती. हा एक रक्तासंदर्भातील आजार आहे. यामुळे स्नेहा प्रचंड अशक्त झाली होती.