Join us  

'सालार' मधील खानसार हादरवून सोडणारी राधा मन्नार आहे तरी कोण? क्रिकेटरसोबत आहे नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 3:19 PM

1 / 8
बाहुबली नंतर एकही हिट चित्रपट न देणाऱ्या अभिनेता प्रभासचा (Prabhas) नुकताच 'सालार' सिनेमा रिलीज झाला. प्रशांत नील यांच्या या सिनेमाने प्रभासचं करिअर सावरलं आहे.सध्या सिनेमा जोरदार कमाई करतोय.
2 / 8
सिनेमाची कथा खानसार या शहराभोवती फिरते. खानसारवर राजा मन्नारचं राज्य असतं जो अतिशय भीतीदायक असतो. तर राजा मन्नारची लेक राधा मन्नारच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री श्रेया रेड्डीनेही (Sriya Reddy) सध्या लक्ष वेधून घेतलंय. राधाची भूमिकाही अतिशय भीतीदायक दाखवण्यात आली आहे. श्रेयाचा छोटा कॅमिओ सुद्धा मुख्य अभिनेत्री श्रृती हसनवर भारी पडला आहे.
3 / 8
श्रेया रेड्डी साऊथ फिल्म्समधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तमिळ, तेलुगू मध्ये बरंच काम केलं आहे. तसंच तिने व्हिडिओ जॉकी म्हणूनही काम केलं आहे. सालार सिनेमातील तिचा अभिनय पाहून चाहते प्रभावित झालेत.
4 / 8
श्रेया रेड्डीने फिल्म निर्माता आणि अभिनेता विजय कृष्णा रेड्डीशी 2008 मध्येच लग्न केले. यानंतर तिने १० वर्षांचा ब्रेक घेत 2018 मध्ये अभिनयात कमबॅक केले. तिचा पहिला सिनेमा 'समुराई' हा होता ज्यामध्ये तिने कॅमिओच केला होता. त्याआधी ती व्हिडिओ जॉकी म्हणूनच काम करायची.
5 / 8
भारताचे माजी टेस्ट क्रिकेटर भरत रेड्डीची ती मुलगी आहे. तिने 2002 मध्ये अभिनयात पदार्पण केले होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिला मॉडेलिंगच्या ऑफर यायला लागल्या होत्या. मात्र तिने शिक्षण पूर्ण करावं अशी वडिलांची इच्छा होती म्हणून तिला ऑफर्स नाकारव्या लागल्या.
6 / 8
श्रेयाने तिच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. Veyil आणि Kanchivaram या दोन सिनेमांसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
7 / 8
'सालार'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगताना श्रेया म्हणाली, 'प्रशांत नीलने आधीच मला सांगितलं होतं की तुझी भूमिका जबरदस्त असणार आहे. या भूमिकेसाठी अनके फोन कॉल्स आणि लुकटेस्ट झाले.माझ्या भूमिकेचं कौतुक होईल असं मला वाटलं होतं पण प्रेक्षकांकडून इतकं प्रेम मिळेल याची मी कल्पनाच केली नव्हती.
8 / 8
तसंच सुपरस्टार प्रभासबद्दल ती म्हणाली,'मी जेव्हा प्रभासला माझा स्क्रीन टाईम कमी करण्याविषयी सांगितले त्यावर त्याने अजिबातच सहमती दर्शवली नाही. तो खरंच खूप प्रामाणिक अभिनेता आहे. तसंच त्याचा हा कमबॅक पाहून छान वाटतंय.
टॅग्स :सेलिब्रिटीप्रभाससिनेमाश्रुती हसन