Join us  

सचिन पिळगावकरांच्या लेकीचं बोल्ड फोटोशूट, सोनाली बेंद्रेलाही पडली भुरळ, कमेंट करत म्हणाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 6:25 PM

1 / 6
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. आईवडिलांप्रमाणेच त्यांची लेक श्रीया पिळगावकरही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. श्रियाने अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
2 / 6
श्रीया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा श्रीया तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. नुकतंच श्रीयाने बोल्ड फोटोशूट केलं आहे.
3 / 6
श्रीयाने काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. तिने हेअरस्टाइल आणि हटके मेकअप केला आहे. तिच्या हा बोल्ड लूक पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.
4 / 6
श्रीयाच्या या हॉट फोटोशूटची सर्वत्र चर्चा आहे. तिच्या या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रीयाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी फोटोंवर कमेंटही केल्या आहेत.
5 / 6
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेलाही श्रीयाच्या या लूकची भूरळ पडली आहे. श्रीयाच्या या फोटोंवर सोनालीने कमेंट करत “लव्ह” असं म्हटलं आहे.
6 / 6
अवघी पाच वर्षांची असल्यापासून श्रीयाने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सचिन पिळगावकरांच्या ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. ‘इश्क ए नादान’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :सचिन पिळगांवकरश्रिया पिळगावकरसोनाली बेंद्रे