Join us  

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावर रितेशची लय भारी कमेंट, स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 7:50 PM

1 / 10
विवेक रंजन अग्निहोत्री यांचा नुकताच रिलीज झालेला 'द काश्मीर फाइल्स' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने केवळ चार दिवसांत 43.5 कोटींचा गल्ला जमवला.
2 / 10
शाहीद कपूरचा ब्लॉकबस्टर 'कबीर सिंग', अक्षय कुमारचा 'रुस्तम', अजय देवगणचा 'शिवाय' आणि शाहरुख खानच्या 'रा वन'ला या सिनेमालाही याने मागे टाकलं आहे.
3 / 10
दरम्यान, अभिनेत्री यामी गौतम आणि तिचा पती-चित्रपट निर्माता आदित्य धर यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शन 'द काश्मीर फाईल्स' ला आपला पाठिंबा दर्शविला आहे, ज्याने 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची वेदनादायक कथा उलगडली आहे.
4 / 10
या चित्रपटावरुन दोन गट पडल्याचे दिसून येतात, सोशल मीडियावरही दोन गटांमध्ये याची चर्चा असून एक विरोधात तर दुसरा समर्थनार्थ उतरल्याचं दिसून येतं.
5 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी या चित्रपटाचं कौतूक केलंय, तर काहीजण या चित्रपटावर कमेंट करणंही टाळत आहेत. त्यातच, बॉलिवूडचा लय भारी अभिनेता रितेश देमुखनेही या सिनेमावर स्पष्ट मत मांडलं.
6 / 10
रितेशने कोणतीही भीड न ठेवता या कलाकृतीचं कौतूक केलंय. या सिनेमातील अभिनेता आणि दिग्दर्शकांसह संपूर्ण टिमंचं रितेशनं अभिनंदन केलंय.
7 / 10
अनेक विक्रम मोडत असलेल्या चित्रपटाचे कौतुक करण्याची हीच वेळ आहे. एक छोटासा चित्रपट जो आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे.
8 / 10
अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन, असे ट्विट रितेश देशमुख यांनी केलं आहे. तसेच, आपणास प्रेम आणि मोठं कौतूक, असेही त्याने म्हटले.
9 / 10
दरम्यान, यामी गौतमीने गेल्या वर्षी दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले. आदित्यचा जन्म एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला, त्यामुळे द काश्मीर फाइल्सवर यामीचे मत महत्त्वाचे आहे.
10 / 10
यामी म्हणाली- 'मी एका काश्मिरी पंडिताशी लग्न केले आहे, त्यामुळे मला माहीत आहे की या शांतताप्रिय समुदायाने कसा अत्याचार सहन केला आहे. मात्र देशातील बहुतांश लोकांना याबाबत माहिती नाही. सत्य जाणून घेण्यासाठी आम्हाला ३२ वर्षे आणि चित्रपटची गरज लागली.
टॅग्स :रितेश देशमुखअनुपम खेरहिंदूजम्मू-काश्मीरसिनेमा