Join us  

वेडिंग कार्डनंतर व्हायरल होतोय ऋषी-नीतू कपूर यांच्या लग्नाचा अल्बम; रॉयल पद्धतीने झालं होतं फेमस कपलचं ग्रँड वेडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 5:01 PM

1 / 9
बॉलिवूडमधील मोस्ट फेव्हरेट कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
2 / 9
येत्या काही दिवसांमध्ये ही जोडी लग्नगाठ बांधणार असून त्यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
3 / 9
सध्या सोशल मीडियावर आलिया-रणबीरच्या लग्नाच्या पत्रिकेपासून ते लग्नात सहभागी होणारे पाहुणे, लग्नाचं ठिकाण, त्यांची सुरक्षा अशा कित्येक गोष्टींची चर्चा रंगली आहे.
4 / 9
रणबीर आलियाच्या चर्चांमध्येच दिवंगत अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाचं रिसेप्शन कार्ड व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होताना दिसत आहे.
5 / 9
सध्या सोशल मीडियावर नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाचे काही फोटो चर्चेत आले आहेत.
6 / 9
२२ जानेवारील १९८० मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली होती.
7 / 9
त्याकाळी नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचं ग्रँड वेडिंग झालं होतं. या लग्नाची आजही चर्चा होते.
8 / 9
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमधून नीतू आणि ऋषी यांचा लग्नसोहळा पाहता येत आहे.
9 / 9
नीतू आणि ऋषी यांचं लग्नदेखील आरके हाऊसमध्ये झालं होतं. इथेच रणबीर आलिया लग्न करणार आहेत.
टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठऋषी कपूररणबीर कपूरआलिया भट