रकुल प्रित सिंगच्या बोल्ड फोटोंमुळे चाहत्यांना बसला धक्का, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST
२०१४ मध्ये दिव्याकुमार खोसलाच्या ‘यारियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी रकुल प्रित सिंग सध्या चांगलीच चर्चेत आहे. वास्तविक रकुल साउथ चित्रपटांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. परंतु सध्या ती बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविताना दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयीच्या ‘अय्यारी’ या चित्रपटातून ती सेकंड इनिंग सुरू करीत आहे. मात्र तत्पूर्वी तिने मॅक्सिम मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट करून खळबळ उडवून दिली आहे.
रकुल प्रित सिंगच्या बोल्ड फोटोंमुळे चाहत्यांना बसला धक्का, पाहा फोटो!
२०१४ मध्ये दिव्याकुमार खोसलाच्या ‘यारियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी रकुल प्रित सिंग सध्या चांगलीच चर्चेत आहे. वास्तविक रकुल साउथ चित्रपटांमधील एक प्रसिद्ध नाव आहे. परंतु सध्या ती बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविताना दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयीच्या ‘अय्यारी’ या चित्रपटातून ती सेकंड इनिंग सुरू करीत आहे. मात्र तत्पूर्वी तिने मॅक्सिम मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट करून खळबळ उडवून दिली आहे. पुरुषांमध्ये लोकप्रिय असलेल्या या साप्ताहिकाच्या फेब्रुवारीच्या अंकासाठी रकुल प्रित सिंगला जागा देण्यात आली आहे. रकुलने केलेल्या या फोटोशूटमध्ये ती खूपच आकर्षक आणि हॉट दिसत आहे. रकुलचा हा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. या अगोदर रकुल बºयाचशा कमी फोटोंमध्ये अशा अंदाजात बघावयास मिळाली असल्याने तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. रकुलअगोदर या मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी साउथमधील श्रेया सरन आणि श्रुति हासन यांनी फोटोशूट केले आहे. रकुलने बॉलिवूड आणि साउथ व्यतिरिक्त ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटातूनही एंट्री केली आहे. तेलगू किंवा तामिळ चित्रपटांमध्ये अभिनेत्री साडी किंवा ट्रेडिशनल ड्रेसेजमध्ये बघावयास मिळतात. अशात रकुलने अतिशय ग्लॅमर आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट केल्यामुळे तिने बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी मेकओवर केल्याची चर्चा आहे. दरम्यान रकुल बोल्ड फोटोशूट करून बॉलिवूडमध्ये आपली नवी पारी सुरू करीत आहे. आता याचा तिला कितपत फायदा होईल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.