Join us  

Preity Zinta : 'डिंपल गर्ल' लग्नाआधीच झालीय 34 मुलांची आई; 'सत्य' समजल्यावर वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 2:59 PM

1 / 11
बॉलिवूडची डिंपल क्वीन प्रीती झिंटा आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. प्रितीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
2 / 11
अभिनेत्री सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. 2016 मध्ये Gene Goodenough याच्याशी लग्न केल्यानंतर, ती चित्रपटांमध्ये कमी एक्टिव्ह दिसते.
3 / 11
लग्नाच्या 5 वर्षानंतर सरोगसीच्या माध्यमातून अभिनेत्रीला दोन जुळी मुलं झाली आहेत. प्रीती अनेकदा तिच्या लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
4 / 11
पण फार कमी लोकांना माहीत आहे की, लग्नाआधीच प्रीती झिंटा 34 मुलांची आई बनली होती. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण सत्य समजल्यावर अभिमान वाटेल.
5 / 11
एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच प्रीती झिंटा एक चांगली व्यक्ती देखील आहे. ती नेहमीच गरीब मुलं आणि महिलांना मदत करत असते.
6 / 11
2009 मध्ये, अभिनेत्रीने 34 व्या वाढदिवशी, ऋषिकेशमधील मदर मिरॅकल अनाथाश्रमातून 34 अनाथ मुलींना दत्तक घेतलं आहे.
7 / 11
अभिनेत्रीने तिच्या एका जुन्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती. ती म्हणाली होती की, मी 34 मुली दत्तक घेतल्या आहेत.
8 / 11
मुलींच्या शिक्षणाचा, जेवणाचा, कपड्याचा खर्च मी उचलणार आहे. त्या सर्व आता माझ्या मुली आहेत. ती माझी जबाबदारी आहे. मी या सर्वांशी जोडून राहीन आणि वर्षातून दोनदा त्यांना भेटेन.
9 / 11
प्रीती सध्या पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहे. चाहते पुन्हा एकदा तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत.
10 / 11
11 / 11
टॅग्स :प्रीती झिंटा