Join us  

प्रार्थना बेहरे वयाच्या चाळीशीतही दिसते खूप ग्लॅमरस, आई कधी होणार विचारल्यावर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 7:00 AM

1 / 12
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
2 / 12
सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. तिने या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
3 / 12
पवित्र रिश्ता या हिंदी गाजलेल्या मालिकेतून प्रार्थनाने कलाविश्वात पदार्पण केले आहे.
4 / 12
नुकताच प्रार्थना बेहरे हिने ४०वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या चाळीशीतही ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
5 / 12
प्रार्थना बेहरे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते.
6 / 12
प्रार्थनाने २०१७ साली अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली. ती बऱ्याचदा पतीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
7 / 12
प्रार्थनाला तिचे चाहते तू आई कधी होणार असा प्रश्न विचारत असतात. तिने एका मुलाखतीत यावर स्पष्ट शब्दात उत्तर दिले होते.
8 / 12
प्रार्थना बेहरे बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रमातील महिला वर्गाने तिला 'तू मालिकेत एका मुलीच्या आईचे पात्र साकारत आहे, तर मग खऱ्या आयुष्यात आई कधी होणार आहेस?' असा प्रश्न तिला विचारला होता.
9 / 12
त्यावर तिने थोडे रागात सुबोध भावेकडे पाहिले आणि त्यावर तिने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले होते.
10 / 12
ती म्हणाली होती की, 'तुम्ही सर्व चांगलेच प्रश्न विचारताय ना? मग चांगलाच प्रश्न विचारा ना? त्यावर महिला वर्गाने हे चांगले आहे, असे म्हटले होते.
11 / 12
त्यापुढे ती म्हणाली, माझ्या सासूबाईही हा शो बघत आहेत. पण मी काही वाईट काम करते का? पण मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना… हा विषय नको.'
12 / 12
प्रार्थना पुढे म्हणाली होती की, 'मला खूप बाळं आहेत. आमच्याकडे पाच पाळीव श्वान आहेत, १२ घोडे आहेत आणि मासे आहेत, दोन उंदीर आहेत, अशी खूप मुलं आहेत. त्याबरोबर मायरा माझी मुलगीच आहे.'
टॅग्स :प्रार्थना बेहरे