Join us

फँटम टीमच्या लोकमतशी गप्पा

By admin | Updated: August 28, 2015 00:00 IST

लोकमतच्या टीमशी गप्पा मारतानाच कॅट सीएनएक्स चाळत होती अचानक तिची नजर शेवटच्या पानावर गेली. १४ ऑगस्ट रोजी प्रकाशित या ...

लोकमतच्या टीमशी गप्पा मारतानाच कॅट सीएनएक्स चाळत होती अचानक तिची नजर शेवटच्या पानावर गेली. १४ ऑगस्ट रोजी प्रकाशित या अंकात अगदी वरच्या भागाला ‘कतरिना ऑन टाइम’ ही तिचीच बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचे कॅटने बारकाईने अवलोकन केले.

सैफला त्याच्या फ्लॉप मूव्हीजबद्दल विचारले असता त्या चित्रपटांनी बॉक्स ऑॅफिसवर प्रभावी कामगिरी न केल्याबद्दल मला काळजी वाटत नसल्याचे तो म्हणाला. मी प्रत्येक चित्रपटात खूप कष्ट करतो. तरीही चित्रपट चालला नाही तर त्यातूनही काही तरी शिकायला मिळतंच आणि मग नव्या चित्रपटात मी जास्त कष्टाने काम करतो असे त्याने सांगितले.

या चित्रपटातील कतरिनाच्या धाडसी दृश्यांबद्दल सध्या खूप चर्चा होत आहे. यावर ती म्हणाली की ती दृश्ये माझ्या भूमिकेची गरज होती. आम्ही जेव्हा चित्रीकरण करत होतो तेव्हा आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश होता तो हा की आपण सगळ्यांनी आपल्यातील सर्वोत्तम द्यायचे आणि माझाही तोच प्रयत्न होता.

फँटम कोणताही देश किंवा धर्माविरुद्ध नसून फक्त आणि फक्त दहशतवाद्यांविरुद्ध आवाज बुलंद करतो असे सैफने सांगितले.

कतरिनाने या चित्रपटात रॉ एजंटची भूमिका साकारली असून ती व सैफ दोघे मिळून एक कामगिरी तडीस नेतात. एवढा वास्तववादी चित्रपट बनविणे सोपे काम नाही असे कतरिना म्हणाली.

हा चित्रपट पाकिस्तानच्या विरोधात नसल्याचे सांगत चित्रपटावर पाकिस्तानात लादण्यात आलेल्या बंदीमुळे धक्का बसला असे कबीर म्हणाला.

बजरंगी भाईजानच्या तूफान यशानंतर कबीर खानचा फँटम हा चित्रपट शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून कतरिना कैफ आणि सैफ अलीखानसह दिग्दर्शक कबीर खानने नुकतीच लोकमतच्या टीमला भेट देऊन दिलखुलास गप्पा मारल्या.