Join us  

Nimmi Death: पाहा निम्मी यांचे कधीही न पाहिलेले हे फोटो... त्यांच्या सौंदर्याची होती चांगलीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 2:25 PM

1 / 11
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे नुकतेच निधन झाले.
2 / 11
निम्मी 88 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळामुळे त्या आजारी होत्या. सांताक्रूजला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
3 / 11
बरसात, दीदार, आन, उडन खटोला आणि बसंत बहार यांसारख्या चित्रपटांत काम करुन निम्मी यांनी अपार लोकप्रियता मिळवली.
4 / 11
1963 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरे महबूब’ या चित्रपटात निम्मी यांना लीड हिरोईनचा रोल ऑफर झाला होता. दिग्दर्शक हरमन सिंह रवैल यांनी निम्मी यांना चित्रपटात लीड रोल दिला होता. पण निम्मी यांनी लीड रोलऐवजी सेकंड लीड रोल हवा म्हणून अडून बसल्या.  लीड रोल सोडून त्यांनी  राजेंद्र कुमार यांच्या बहिणीची भूमिका स्वीकारली.
5 / 11
मेरे महबूब या चित्रपटात सेकंड लीड रोल निम्मी यांना देऊन लीड रोलसाठी साधनाला साईन केले. चित्रपट रिलीज झाला आणि सगळेच उलटे झाले. या चित्रपटाने साधनाला स्टार बनवले आणि निम्मी यांच्या करिअरला ओहोटी लागली. यानंतर निम्मी यांना दुय्यम रोल ऑफर होऊ लागलेत.
6 / 11
पूजा के फुल’ मध्ये निम्मी यांनी आंधळ्या महिलेची भूमिका साकारली होती
7 / 11
आकाशदीपमध्ये निम्मी अशोक कुमार यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसल्या.
8 / 11
ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी त्यांच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्यासाठी ओळखल्या जात.
9 / 11
निम्मी यांचे खरे नाव नवाब बानो होते. वयाच्या केवळ 16 व्या वर्षी त्यांनी अभिनय सुरु केला.
10 / 11
1950-60 च्या दशकात निम्मी यशाच्या शिखरावर पोहोचल्या.
11 / 11
निम्मी यांच्या करिअरमध्ये राज कपूर यांचे खास योगदान होते. त्यांनीच नवाब बानो हे नाव बदलून त्यांचे निम्मी हे नामकरण केले होते.
टॅग्स :निम्मी