Join us  

IN PICS : नयनतारा कधी काळी प्रभुदेवाच्या प्रेमात वेडी होती, आता या दिग्दर्शकावर भाळली...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 8:00 AM

1 / 10
होय, कधी काळी साऊथ सुपरस्टार नयनतारा प्रभुदेवाच्या प्रेमात वेडी होती आणि आता ती विग्नेश शिवन या दिग्दर्शकाच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे.
2 / 10
अलीकडे एका शोमध्ये नयनताराने पहिल्यांदा विग्नेशसोबतच्या नात्याची कबुली दिली. साखरपुडा झाल्याचा खुलासाही तिने केला.
3 / 10
अलीकडे एका शोचा प्रोमो रिलीज झाला. यात नयनतारा साखरपुड्याची अंगठी दाखवते आहे. तिने विग्नेशचे नाव घेतले नाही. पण आता विग्नेशसोबतचे तिचे नाते जगजाहिर आहे.
4 / 10
नयनतारा आणि विग्नेश यांनी 2015 मध्ये तामिळ फिल्म ‘नानुम राउडी धान’मध्ये एकत्र काम केले होते.
5 / 10
विग्नेशच्या आधी नयनतारा प्रभुदेवाच्या प्रेमात अधीच आकंठ बुडाली होती. अ‍ॅक्टर प्रभुदेवासोबत जुळले होते. दोघे लिव्ह इनमध्येही राहात होते.
6 / 10
एकेकाळी नयनतारा आणि प्रभुदेवा यांच्या अफेअरची टॉलिवूड मध्ये जोरदार चर्चा होती.
7 / 10
प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला होता.
8 / 10
2010 मध्ये प्रभुदेवाची पत्नी लताने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती. प्रभुदेवा, नयनतारासोबत लिव-इनमध्ये राहात असल्याचा आरोप तिने केला होता.
9 / 10
प्रभुदेवाने नयनतारासोबत लग्न केले तर ती आमरण उपोषण करेल, अशी धमकीही तिने दिली होती. नयनतारासोबत अफेअर सुरु झाल्यानंतर प्रभुदेवाना त्याचे 16 वर्षांपूवीर्चे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता.
10 / 10
जुलै 2011 मध्ये प्रभुदेवाना त्याची पत्नी लताला घटस्फोट दिला. पण पुढच्याच वर्षी म्हणते 2012 मध्ये प्रभुदेवासोबतचे माझे सर्व संबंध संपल्याचे नयनताराने जाहिर केले होते. तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते.
टॅग्स :प्रभू देवाTollywood