Join us  

कमी वयात लग्न, २०व्या वर्षी बनली आई, नवऱ्यानं सोडली नोकरी अन्..., मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोडला १९ वर्षांचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 6:59 PM

1 / 9
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’मध्ये अंगुरी भाभी हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडले. ही भूमिका मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रेने साकारली होती. शुभांगीला या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. आज शुभांगीचा वाढदिवस असून गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
2 / 9
शुभांगीने लग्नाच्या १९ वर्षांनंतर पती पियुष पुरेबरोबर घटस्फोट घेतला. मार्च २०२३मध्ये शुभांगी आणि पियुष एकमेकांपासून विभक्त झाले. दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. शुभांगीने १९व्या वर्षातच लग्न केले.
3 / 9
लग्नाला एक वर्ष होताच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. तिची मुलगी आशी आता १८ वर्षांची आहे. शुभांगीने मुलगी झाल्यानंतरही कलाक्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता.
4 / 9
पियुषने तिला उत्तम पाठिंबा देत शुभांगीसाठी नोकरीही सोडली. मुलगी लहान असताना तिचा सांभाळ करण्यासाठी पियुषने नोकरीचा त्याग केला. पण आता दोघंही विभक्त झाले आहेत.
5 / 9
शुभांगीने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबाबत सांगितले होतं. एका मुलाखतीमध्ये शुभांगीने म्हटले होते की, गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं एकत्र राहत नाही. पियुष आणि मी आमचं लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले.
6 / 9
सन्मान, विश्वास आणि मैत्रीवरच लग्नाचं नातं टिकून असतं. पण आमच्या मतभेदांमधून कोणताच मार्ग निघत नव्हता. म्हणूनच आम्ही दोघांनी एकमेकांना अंतर देणं, वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणं, करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता, असेही तिने सांगितले.
7 / 9
आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पियुष मुलीला भेटायला येत असल्याचेही तिने सांगितले. मुलीला वडिलांचेही प्रेम मिळाले पाहिजे असे शुभांगीला वाटते.
8 / 9
२००३मध्ये इंदौर येथे शुभांगी आणि पियुष यांचा विवाहसोहळा पार पडला.
9 / 9
आता दोघेही वेगळे राहत आहेत.
टॅग्स :भाभीजी घर पर है