Join us  

"वैभव तत्त्ववादी माझा क्रश होता" प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला-मला तिने...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 3:53 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी (vaibhav Tatwawaadi) . अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याने आपल्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. (Photo instagram)
2 / 8
त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची तुफान क्रेझ आहे. म्हणून, वैभवच्या लव्हलाइफबद्दल वरचेवर चर्चा रंगते. (Photo instagram)
3 / 8
पण एके काळी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळीचं वैभववर क्रश होते. प्राजक्ताने प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. एवढेच नाही तर प्राजक्ताने तिच्या आईला 'हा तुला जावई म्हणून चालेल का' असे देखील विचारले होते.(Photo instagram)
4 / 8
वैभव तत्ववादीच्या 'कॉफी आणि बरंच काही' या चित्रपटानंतर तिचा तो क्रश झाला होता. पण प्राजक्ताने त्याला हे कधीच सांगितले नाही.(Photo instagram)
5 / 8
आता तो माझा क्रश राहिलेला नाही, असं प्राजक्ता म्हणाली होती. वैभव आणि प्राजक्ता एकमेकांचे चांगले मित्र आहेत. लवकरच त्यांचा एक चित्रपट सुद्धा येणार आहे..(Photo instagram)
6 / 8
प्राजक्ताच्या या वक्तव्यावर वैभवने लोकसत्ता दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. (Photo instagram)
7 / 8
वैभव म्हणाला, ''प्राजक्तानेच मला त्या मुलाखतीचा व्हिडीओ पाठवला होता. मी तुझ्याबद्दल असं बोलली हे ही तिने मला सांगितलं. एका सुंदर मुलीने क्रश असल्याचं सांगितल्यावर एका मुलाच्या ज्या भावना असतील. त्याच माझ्या ही होत्या.”(Photo Instagram)
8 / 8
आज प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाची क्रश बनली आहे. अभिनेत्रीचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. (Photo instagram)
टॅग्स :वैभव तत्ववादीप्राजक्ता माळी