Join us  

'...तर मी आता लग्नाला उभी राहीन', अभिनेत्री सायली संजीवला हवाय असा लाइफ पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 4:32 PM

1 / 8
सायली संजीव मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपटात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. शेवटची ती झिम्मा २ आणि ओले आले या सिनेमात झळकली आहे. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
2 / 8
आज सायली संजीव तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करते आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. तिचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
3 / 8
अभिनेत्री सायली संजीव बऱ्याचदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते. दरम्यान तिने देखील लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत आपला जोडीदार कसा असावा याबद्दल सांगितले होते.
4 / 8
यावेळी सायली म्हणाली होती की, आपण आपल्या बॉयफ्रेंड आणि नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांना बघत असतो. कारण त्या व्यक्ती इतके प्रेम आपण दुसरे कोणावर करू शकत नाही, त्यामुळे तिच इमेज आपण आपल्या लाईफपार्टनरबरोबर बघत असतो.
5 / 8
ती पुढे म्हणाली की, आपण आपल्या आयुष्यातले २०-३० वर्ष ज्या व्यक्तीबरोबर घालवले, त्या व्यक्तीवर आपण प्रेम करत असतो. जितकं प्रेम आपले वडील आपल्यावर करतात, तितकं प्रेम आपल्या नवऱ्याने केले तर चांगलेच आहे.
6 / 8
माझ्या वडिलांनी माझ्यावर जेवढं निस्वार्थी आणि खरेपणाने प्रेम केलं, तसं प्रेम मिळालं तर मी आत्ता लग्नाला उभी राहीन, असे सायलीने म्हटले होते.
7 / 8
सायली संजीवने काही दिया परदेस, शुभमंगल ऑनलाइल या मालिकेत काम केले आहे. याव्यतिरिक्त झिम्मा, झिम्मा २, आटपाडी नाइट्स, बस्ता, सातारचा सलमान, गोष्ट एका पैठणीची, मन फकिरा यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
8 / 8
लवकरच सायली संजीव ऋषी सक्सेनासोबत समसारा चॅप्टर १ मध्ये दिसणार आहे. काहे दिया परदेस मालिकेनंतर ऋषी आणि सायली पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत.
टॅग्स :सायली संजीव