Join us  

'रानबाजार'मधील बोल्ड सीन्समुळे चर्चेत आली तेजस्विनी पंडित, खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 5:56 PM

1 / 9
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या तिची आगामी वेबसीरिज रानबाजारमुळे चर्चेत आली आहे.
2 / 9
रानबाजारचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यातील तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीचे बोल्ड सीन्सची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
3 / 9
हा मराठीमधील सगळ्यात बोल्ड टीझर असल्याचे बोलले जात आहे.
4 / 9
रानबाजार या सीरिजचा टीझर तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
5 / 9
पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
6 / 9
सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.
7 / 9
तेजस्विनीचा कधी न पाहिलेला लूक यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
8 / 9
तेजस्विनीने यापूर्वी बोल्ड लूकमध्ये बऱ्याचदा फोटोशूट केले आहे.
9 / 9
तेजस्विनी पंडित खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
टॅग्स :तेजस्विनी पंडित