Join us  

"मध्यरात्री उठून तो श्वास घेतोय का हे पाहते", श्रेयसच्या Heart Attack बद्दल बोलताना पत्नी भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 3:56 PM

1 / 8
अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर मराठीबरोबरच बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. कोणतंही व्यसन नसलेल्या आणि एकदम फिट असलेल्या श्रेयसला काही दिवसांपूर्वीच अचानक हृदयविकाराचा झटका आला.
2 / 8
हृदयविकाराचा झटका आलेल्या श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने मृत्यूच्या दारातून परत आणलं. श्रेयसवर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. त्यानंतर आता तो कामावर परतला आहे.
3 / 8
श्रेयस आणि दीप्तीने नुकतीच 'मित्र म्हणे' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी त्या कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केलं.
4 / 8
दीप्ती भावुक होत म्हणाली, 'मी अजूनही मध्यरात्री उठून बसते आणि श्रेयसकडे बघत राहते. तो श्वास घेतोय का? हे मी पाहत असते. त्याची छाती आणि पोट हलतंय का हे मी पाहते.'
5 / 8
'जेव्हा मला खात्री होते की तो श्वास घेतोय तेव्हा मी परत झोपते. हॉस्पिटलमधून तो घरी आल्यानंतरही मी त्याच्याकडे नुसतंच बघत बसायचे.'
6 / 8
'माझ्या डोक्यात कोणतेच विचार नसायचे. पण, मी फक्त बघत राहायचे. तो आहे, फक्त ही खात्री मला हवी असायची.'
7 / 8
'तो बसलेला असतानाही मी त्याला हात लावून बघायचे. मी आताही असं करते.'
8 / 8
श्रेयस आणि दीप्तीने २००४ साली लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगीही आहे.
टॅग्स :श्रेयस तळपदेहृदयविकाराचा झटकामराठी अभिनेता