Join us  

अभिनेत्री ते उद्योजिका कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने गाठला मोठा पल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 3:57 PM

1 / 10
मराठी मनोरंजनक्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेचा आज वाढदिवस आहे.
2 / 10
2 फेब्रुवारी 1988 रोजी पुण्यात एका मराठी कुटुंबात जन्मलेली श्रेया गुजराती कुटुंबाची सून आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी श्रेयाचे गुजराती असलेल्या निखिलसोबत लग्न झाले होते.
3 / 10
श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. तिची कारकीर्द अगदी लहान वयात सुरू झाल्यामुळे तिला खूप मोठा अनुभव आहे.
4 / 10
छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम ‘फू बाई फू’मधून श्रेयानं प्रेक्षकांच मनोरंजन केलं. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली.
5 / 10
'चला हवा येऊ द्या' मधून अभिनयाच्या जोरावर श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्रेयाने 'चला हवा येऊ द्या' मध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत, आणि त्या लोकांना आवडल्या देखील आहेत.
6 / 10
उत्तम अभिनय व विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ती लोकप्रिय आहे. श्रेयाने तिच्या विनोदबुद्धीने जरी प्रेक्षकांचे मन जिंकले.
7 / 10
श्रेयाचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. 'चला हवा येऊ द्या' नंतर तिला अफाट प्रसिद्धी आणि यश मिळालं.
8 / 10
अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
9 / 10
‘तू तिथे मी’, ‘अस्मिता’, ‘फू बाई फू’ अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत.
10 / 10
श्रेया आता अभिनयाबरोबर श्रेयाने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केले आहे. नुकतेच श्रेया बुगडेने दादरमधील शिवाजी पार्कमध्ये द बिग फिश अँड कंपनी हे नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या रेस्टॉरंटचा आज शुभारंभ करण्यात आला. दादरमधील हे रेस्टॉरंट सीफूड स्पेशल आहे.
टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्यासेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपट