Join us  

रिंकू राजगुरुने लूकवर घेतली इतकी मेहनत पूर्वीपेक्षाही दिसते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 10:40 AM

1 / 10
'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हे नाव घराघरात पोहोचले. 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते.
2 / 10
सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
3 / 10
आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते.
4 / 10
तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. काही दिवसांपूर्वी रिंकूने तिचा पार्टी गाऊनमधला फोटो इन्स्टावर शेअर केला होता.
5 / 10
ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत होती. फोटोतला हा लूक रिंकूच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे.
6 / 10
त्यानंतर रिंकूने पुन्हा एकदा इन्डो वेर्स्टन लूकमधला फोटो शेअर केला आहे. त्याचा हा लूक नेहमी प्रमाणे तिच्या फॅन्सना भावला आहे.
7 / 10
सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा आता फुलऑन मेकओव्हर झाला आहे.
8 / 10
सैराट रिलीज होण्याआधीची रिंकू आणि आत्ताची रिंकू यांत बराच फरक पाहायला मिळेल.
9 / 10
गावरान अंदाजातील रिंकूचा जणू काही कायापालट झाल्याचे तुम्हाला तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल.
10 / 10
इन्स्टापेजवर नजर टाकाल तर तुम्हाला तिच्या विविध ग्लॅमरस अदा पाहायला मिळतील.
टॅग्स :रिंकू राजगुरू