Join us  

'सैराट'मधील आर्चीची मैत्रीण 'आनी'नं सिनेइंडस्ट्रीला ठोकला रामराम? आता तिला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 6:00 AM

1 / 9
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावत आपल्या प्रेमात पाडणारा चित्रपट म्हणजे 'सैराट' (sairat). नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी कलाविश्वात तुफान लोकप्रियता मिळवली. इतकेच नाही तर या चित्रपटातील सर्व पात्रं घराघरात पोहचले.
2 / 9
आजही हा चित्रपट आठवला तर डोळ्यासमोर येतात आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या. मात्र यातील आणखी एका अशाच पात्राने सर्वांचे लक्ष वेधले होते, ते पात्र म्हणजे आनीचं.
3 / 9
आर्चीची मैत्रीण आनीची भूमिका अनुजा मुळे (Anuja Muley) हिने साकारली होती. सैराटनंतर अनुजा कलाविश्वातून गायब झाली. त्यानंतर ती कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. ती एका वेगळ्या क्षेत्रात करियर करत असून तिला आता ओळखणंदेखील कठीण झाले आहे.
4 / 9
पुण्यात शिकत असताना अनुजा मुळेने एका एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. यातील ‘चिट्ठी’ या एकांकिकेतील अभिनयासाठी तिला पारितोषिक मिळाले होते़. याचमुळे ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिची आनीच्या भूमिकेसाठी निवड केली होती.
5 / 9
सैराटनंतर अनुजा मुळे इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. त्यामुळे ती सध्या काय करते आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्व जण उत्सुक आहेत.
6 / 9
तर ती कलाविश्वापासून दुरावली आहे आणि सध्या वकीली करते आहे. खुद्द तिनेच एकदा याबद्दल सोशल मीडियावर सांगितले होते. वकिलीत तिने ‘मास्टर्स’ पदवी मिळवली आहे.
7 / 9
अनुजा मुळेचे सोशल मीडियावर काही लेटेस्ट फोटो पाहायला मिळत आहेत. तिच्यात खूप बदल झाल्याचे फोटो पाहिल्यावर समजते आहे.
8 / 9
तिचे लेटेस्ट फोटो पाहून तिला ओळखणंदेखील कठीण झाले आहे.
9 / 9
त्यामुळे आता आनी म्हणजेच अनुजा मुळे पुन्हा कलाविश्वात काम करताना दिसणार की नाही, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
टॅग्स :सैराट 2