Join us  

रबने बना दी जोडी..! सोनाली कुलकर्णीचे फिऑन्सेसोबतचे रोमँटिक फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 7:00 AM

1 / 7
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने फिऑन्से कुणाल बेनोडेकरसोबतचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2 / 7
लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधीच म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकरशी आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दुबईमध्ये साखरपुडा केला होता. तिच्या साखरपुड्याला आज 6 महिने पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनालीने कुणालसोबत एक रोमँटिक फोटो शेअर आपला आनंद व्यक्त केला आहे.
3 / 7
या फोटोमध्ये सोनालीने आकाशी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. कुणाल बेनोडेकर तिचा हात पकडून तिला प्रपोज करतानाचा हा क्युट फोटो आहे.
4 / 7
दुबईच्या वाळवंटात हे फोटोशूट करण्यात आल्याचे या फोटोवरुन दिसत आहे.
5 / 7
'हा तो दिवस आहे ज्या दिवशी मी कुणालला हो बोलले,' असे कॅप्शन सोनालीने या फोटोखाली दिले आहे.
6 / 7
कुणाल बेनोडेकर हा दुबई येथे चार्टर्ड अकाउंटंट आहे. मिडल ईस्ट, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक मधील भागात कुणाल काम करतो.
7 / 7
मागील अनेक वर्ष कुणाल आणि सोनाली एकमेकांना डेट करत आहेत. अद्याप सोनालीने लग्नाची तारिख किंवा लग्नानंतर शिफ्ट होणार का याविषयी मौन बाळगले आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी