Join us  

सागर किनारे...! प्रिया-उमेशची रोमँटिक गोवा ट्रीप, नवीन फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 10:49 AM

1 / 8
मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक जोडी ती म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat). सध्या ही जोडी गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे. त्यांच्या गोवा व्हॅकेशनची सोशल मीडियावर चर्चा आहे.
2 / 8
प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यात ८ वर्षांचं अंतर आहे. प्रिया अतिशय बडबडी, खुलून बोलणारी तर उमेश थोडा रिझर्व्ह स्वभावाचा आहे. दोन विरुद्ध स्वभावाच्या या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे.
3 / 8
कॉलेजमध्ये असतानाच प्रिया उमेशच्या प्रेमात पडली होती. उलट उमेशनेच तिला हो म्हणण्यासाठी वेळ घेतला होता. तेव्हा उमेश मराठी मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय झाला होता. तर प्रियाची हळूहळू करिअरला सुरुवात होत होती.
4 / 8
'नवा गडी नवं राज्य' या नाटकानंतर या जोडीचं आता 'जर तरची गोष्ट' हे नाटक गाजतंय. रिअल लाईफ असो किंवा रील लाईफ त्यांची केमिस्ट्री सगळीतकडे हिटच आहे.
5 / 8
नुकतंच प्रियाने वडिलांचा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण कुटुंबाने गोव्यात सेलिब्रेशन केले. यावेळी प्रियाची बहीण, नवरा आणि मुलगीही होते. सर्वांनी व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत वडिलांसोबत वाढदिवस साजरा केला.
6 / 8
यावेळी ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये प्रिया कमालीची सुंदर दिसत होती. कानात तिने मोठ्या रिंग्स घातल्या होत्या. प्रियाचा हा वेस्टर्न लूक पाहून चाहते घायाळ झाले.
7 / 8
प्रियाने उमेशसोबत बीचवर वेळ घालवला. सूर्यास्तावेळी त्यांनी काढलेले हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. उमेशही ब्लॅक टीशर्ट आणि व्हाईट शॉर्ट्समध्ये हँडसम दिसत आहे.
8 / 8
'चाळीशील न्यूली मॅरिड जोडी', 'तुम्ही दोघंही खूपच गोड आहात' अशा कमेंट्स करत चाहत्यांनी या कपल वर कौतुकाचा वर्षाव केलाय.
टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतगोवाव्हायरल फोटोज्सोशल मीडिया