Pooja Sawant Engagement : अखेर पूजा सावंतच्या साखरपुड्याचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 19:59 IST
1 / 8अभिनेत्री पूजा सावंतचा नुकताच साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्रीचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 2 / 8 पूजा सावंतने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत १६ फेब्रुवारीला एंगेजमेंट केल्याचे सांगितले.3 / 8काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने जोडीदारासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. 4 / 8 पूजाने साखरपुड्यादरम्यान हिरव्या रंगाची पैठणी साडी, नाकात नथ, हार असा लूक केला होता. 5 / 8तर सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता.6 / 8पूजा सावंतच्या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.7 / 8पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. 8 / 8पूजा सावंतने दगडी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलेय. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.