Join us  

Nehha Pendse : मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे नवऱ्यासोबत परदेशात करतेय व्हॅकेशन एन्जॉय, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:23 PM

1 / 9
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
2 / 9
नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
3 / 9
२०२२ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत आणि बरेच सेलिब्रेटी वर्षाखेरीस आपल्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले आहेत. नेहा पेंडसेदेखील व्हॅकेशनसाठी गेली आहे.
4 / 9
नेहा पेंडसे पती शार्दुल सिंग बयाससोबत जपान येथे व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.
5 / 9
नेहा पेंडसे हिने जपान व्हॅकेशन्सचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा नवरादेखील पाहायला मिळत आहे.
6 / 9
जपानमध्ये सध्या थंडी असल्यामुळे नेहा आणि तिच्या नवऱ्याने संपूर्ण शरीर उबदार कपड्याने झाकलेले दिसत आहे.
7 / 9
नेहा पेंडसे हिने ५ जानेवारी, २०२० साली बिझनेसमन शार्दुल सिंग बयाससोबत लग्नगाठ बांधली. शार्दुलचं हे दुसरं लग्न आहे.
8 / 9
लग्नानंतर नेहा पेंडसेला खूप ट्रोल करण्यात आले. तिने पैशांसाठी त्याच्यासोबत लग्न केल्याचे ट्रोलर्स म्हणणे होते.
9 / 9
नेहा पेंडसेने मराठी चित्रपटांशिवाय हिंदी मालिकेत काम केले आहे. तसेच ती बिग बॉस १२मध्येही झळकली आहे.
टॅग्स :नेहा पेंडसेबिग बॉस