Join us

मृणालचे रोमँटिक फोटोसेशन

By admin | Updated: April 8, 2016 01:52 IST

लग्नाच्या आधी मस्तपैकी एकदम भारी डेस्टिनेशनवर जाऊन प्री मॅरिज फोटोशूट करण्याची क्रेझ सध्या कपल्समध्ये वाढत आहे. लग्नाच्या आधीच असे झक्कास फोटो काढून ते सोशल साईट्सवर अपलोड केले

लग्नाच्या आधी मस्तपैकी एकदम भारी डेस्टिनेशनवर जाऊन प्री मॅरिज फोटोशूट करण्याची क्रेझ सध्या कपल्समध्ये वाढत आहे. लग्नाच्या आधीच असे झक्कास फोटो काढून ते सोशल साईट्सवर अपलोड केले जातात. आता पाहा ना माझी या प्रियाला प्रीत कळेना असे म्हणणारी सोज्वळ अभिनेत्री मृणाल दुसानीस नुकतीच लग्नबंधनात अडकली. प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमी दूर पळणारी मृणाल तिच्या खासगी आयुष्यात काय चालू आहे याचा थांगपत्तादेखील कोणाला लागू देत नाही. परंतु, नुकतेच तिच्या प्री मॅरिज फोटोशूटचे रोमँटिक फोटो सोशल साईट्सवर वायरल झाले असून तिच्या चाहत्यांकडून या फोटोंना प्रचंड लाइक्स मिळत आहेत. बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मृणाल आणि नीरज या दोघांनी हे रोमँटिक फोटोसेशन केलं आहे. दोघांचीही केमिस्ट्री या फोटोमध्ये अफलातून दिसून येते. तर मग, मृणालच्या या फोटोसेशनला लाईक तर बनतोच ना.