Join us  

Photos: 'किल्ला' सिनेमातील 'चिनू' आता खूपच बदलला, परदेशात करतोय 'ही' नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 11:50 AM

1 / 11
मराठीतील अनेक प्रभावी सिनेमांपैकी एक म्हणजे 2014 साली आलेला 'किल्ला'(Killa). अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि बालकलाकार अर्चित देवधर (Archit Deodhar), पार्थ भालेराव (Parth Bhalerao) यांनी सिनेमा मुख्य भूमिका साकारली.
2 / 11
लहान मुलांचं भावविश्व या सिनेमात उत्तमरित्या रेखाटण्यात आलं आहे. एक मुलगा ज्याला वडील नाहीत. नोकरी सांभाळत आई लेकाचा सांभाळ करत असते. मात्र आईची नोकरी ही फिरतीची असल्याने तिची सतत बदली होत असते.
3 / 11
सततच्या बदलीचा परिणाम त्या चिमुकल्या मुलाच्या मनावर कळत नकळतपणे होत असतो. एखाद्या गावात तो मुलगा सेट होणार तोच काही वर्षात पुन्हा बदली होते आणि त्यांना गाव सोडून जावं लागतं. त्याचे मित्र तुटतात, शाळा सुटते. यामुळे तो मुलगा खूपच आतल्या आत दबला जातो.
4 / 11
या सिनेमात बालकलाकार अर्चित देवधरने चिन्मय (चिनू) ही भूमिका साकारली आहे. तर अमृता सुभाष त्याच्या आईच्या भूमिकेत आहे. पार्थ भालेराव गावातील मित्राच्या भूमिकेत आहे. या तिघांनी उत्तम अभिनय करत प्रेक्षकांचं मन जिंकलं. हा सिनेमा प्रेक्षकांच्या कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहील असा आहे.
5 / 11
किल्ला मधला चिनू अर्थात अभिनेता अर्चित देवधर आता मोठा झाला आहे. अर्चित २२ वर्षांचा असून त्याला आता ओळखणंही कठीण झालंय.
6 / 11
लहानपणी शांत, क्युट दिसणारा हा मुलगा आता खूपच हँडसम लुकमध्ये दिसत आहे. अर्चितचे सोशल मीडियावरील फोटो बघून हे लक्षात येईल.
7 / 11
अर्चित सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून त्याचे अनेक चाहते आहेत. 'किल्ला' या सिनेमानंतर त्याने '६ गन' आणि 'सिद्धांत' मध्ये काम केलं. मात्र यानंतर अर्चित सिनेइंडस्ट्रीतून गायबच झाला. त्याने अभिनयला रामराम करत करिअरची वेगळी वाट धरली.
8 / 11
अर्चित मूळचा पुण्याचा असून त्याने बर्मिंगहॅमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. अर्चितला शेफ व्हायचं होतं आणि यात त्याला यशही आलं.
9 / 11
परदेशात त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आणि तो आता युकेमध्ये शेफ म्हणून काम करतो. वेगवेगळ्या डिशेस बनवतो. त्याचे फोटो तो सोशल मीडियावर अपलोड करत असतो.
10 / 11
नुकतंच अर्चितने त्याच्या परदेशातील मित्रपरिवारासोबत एन्जॉय करतानाचे काही फोटो पोस्ट केले. यामध्ये तो पार्टी करताना दिसत आहे. तो सध्या लंडनमध्ये राहत असून आता तिथेच स्थायिक झाला आहे.
11 / 11
अर्चितला आजही चाहते 'किल्ला' मधील चिनू नावानेच जास्त ओळखतात. किल्ला सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आजही अनेक जण या सिनेमाच्या आठवणीत रमतात. सौजन्य: charchiet इन्स्टाग्राम अकाऊंट
टॅग्स :मराठी अभिनेताअमृता सुभाषमराठी चित्रपट