Join us  

सिल्कच्या साडीत खुललं श्रुती मराठेचं सौंदर्य; चाहत्यांच्या खिळल्या फोटोवर नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 4:17 PM

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.
2 / 9
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर श्रुतीने मराठी कलाविश्वात स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
3 / 9
कलाविश्वाप्रमाणेच श्रुती सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते.
4 / 9
अलिकडेच श्रुतीने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
5 / 9
या फोटोमध्ये श्रुती कमालीची सुंदर दिसत असून तिचा प्रत्येक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहे.
6 / 9
सनई चौघडे या चित्रपटातून श्रुतीने २००८ साली कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता ती लोकप्रिय झाली.
7 / 9
श्रुतीला राधा ही बावरी या मालिकेतून खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
8 / 9
मराठी कलाविश्वाप्रमाणेच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. २०१६ साली आलेल्या बुधिया सिंग बॉर्न टू रन या चित्रपटात ती झळकली आहे.
9 / 9
श्रुती रमा माधव, तप्तपदी, पुणे-मुंबई-पुणे २ या गाजलेल्या चित्रपटांमध्येही झळकली आहे.
टॅग्स :श्रुती मराठेसेलिब्रिटीसिनेमा