Join us  

डोईला मुंडावळ्या, गळ्यात हार अन्...; शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या शाही विवाहसोहळ्याचा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 4:34 PM

1 / 9
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. गुपचूप साखरपुडा केल्यानंतर आज त्यांनी लग्नगाठ बांधली.
2 / 9
ठाणेमधील येऊर येथील एक्झॉटिका द ट्रॉपिकल रिट्रीट या रिसॉर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
3 / 9
शिवानी-अजिंक्यच्या शाही विवाहसोहळ्याला मराठी कलाविश्वातील मंडळींनीही हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
4 / 9
घोड्यावर वरात घेऊन अजिंक्य विवाहसोहळ्यात आला होता तो क्षण.
5 / 9
आयुष्यातील या खास क्षणासाठी शिवानी आणि अजिंक्यने शाही लूक केला होता.
6 / 9
शिवानीने बदामी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तर अजिंक्यने सूट परिधान करत डोक्यावर फेटा बांधला होता.
7 / 9
शिवानी आणि अजिंक्यने ३१ जानेवारीला साखरपुडा केला. त्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला.
8 / 9
त्यानंतर १ फेब्रुवारीला अजिंक्य आणि शिवानीने विवाहबंधनात अडकत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
9 / 9
मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत शिवानी आणि अजिंक्यने सात फेरे घेत लग्नगाठ बांधली आहे.
टॅग्स :शिवानी सुर्वेमराठी अभिनेताटिव्ही कलाकार