Join us  

Photos: प्रसाद ओकचा लेकही आहे डॅशिंग; लूकमध्ये देतोय वडिलांना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 7:00 AM

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक.
2 / 9
उत्तम अभिनयशैलीमुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या दमदार दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे.
3 / 9
'हिरकणी', 'चंद्रमुखी' असे गाजलेले चित्रपट प्रसादने मराठी कलाविश्वाला दिले आहेत.
4 / 9
कलाविश्वाप्रमाणेच प्रसाद सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.
5 / 9
अनेकदा प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओक काही ब्रँडचं प्रमोशन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांचे बरेचसे फोटो पाहायला मिळतात.
6 / 9
सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रसादच्या लेकाची चर्चा रंगली आहे. प्रसाद अनेकदा त्याच्या मुलांसोबतचे फोटोही नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतो.
7 / 9
प्रसादला मयंक आणि सार्थक अशी दोन मुलं आहेत. यात सध्या मयंकची चर्चा रंगली आहे.
8 / 9
प्रसादच्या लेकाचा मयंकचा सोशल मीडियावर फारसा वावर नाही. मात्र, प्रसाद त्याच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असतो.
9 / 9
मयंक सध्या कॉलेजमध्ये शिकत असून डेसिंगसेन्स वा लूकच्या बाबतीत प्रसादला तोडीस तोड असल्याचं पाहायला मिळतं. (फोटो सौजन्य: प्रसाद ओक इन्स्टाग्राम पेज)
टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटीसिनेमा