Join us  

"महाराजांवर १००० चित्रपट आले तरी कमीच आहेत, पण...", ऐतिहासिक सिनेमांबाबत गश्मीर महाजनी स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 5:10 PM

1 / 10
मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. अभिनयाबरोबर गश्मीर त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो.
2 / 10
गश्मीरने मराठीबरोबर हिंदी कलाविश्वही गाजवलं. त्याने अनेक सिनेमांत विविधांगी भूमिका साकारल्या.
3 / 10
'सरसेनापती हंबीरराव' सिनेमात त्याने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने ऐतिहासिक चित्रपटांबाबत भाष्य केलं.
4 / 10
'अजब गजब' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'मला छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा करायची इच्छा आहे. आता शक्य झालं नाही तर मी पुढच्या २-३ वर्षांत नक्की करेन. पण, जेव्हा सिनेमा करेन तेव्हा तो व्यवस्थित करेन.
5 / 10
'माझ्याकडे खूप ऐतिहासिक सिनेमे येतात. पण, असे सिनेमे खूप जबाबदारीने बनवावे लागतात. प्रेक्षक म्हणतात की ऐतिहासिक सिनेमे खूप येत आहेत.'
6 / 10
'पण, महाराजांच्या कारकीर्दीतील इतके किस्से आहेत. अनेक सुभेदार, मावळे आणि शूरवीर त्यांच्या कारकीर्दीत घडले. त्यामुळे महाराजांच्या कारकीर्दीवर १००० चित्रपट झाले तरी ते कमीच आहेत.'
7 / 10
'इतक्या कथा आहेत त्यामुळे कितीही चित्रपट झाले तरी हरकत नाही. पण, ते जबाबदारीने केले गेले पाहिजेत.'
8 / 10
'एक चांगला ऐतिहासिक चित्रपट करण्यासाठी २-३ वर्ष लागतात. पण, दुर्देवाने तेवढा वेळ कोणता दिग्दर्शक-निर्माता द्यायला तयार नाही.'
9 / 10
'माझ्याकडे आलेले प्रोजेक्टही असेच होते. मी त्यांना तेवढा वेळ द्यायला तयार असतो.'
10 / 10
'पण, त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही. लोक ६-६ महिन्यात चित्रपट काढून प्रदर्शित करत आहेत. असा ऐतिहासिक सिनेमा चांगला होत नाही.'
टॅग्स :गश्मिर महाजनीसेलिब्रिटीछत्रपती शिवाजी महाराजसिनेमा