कपिलच्या शोमध्ये 'सैराट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 11:11 IST
एका असा शो की ज्या कार्यक्रमात फक्त बॉलीवुडचे स्टार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. पण नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट ...
कपिलच्या शोमध्ये 'सैराट'
एका असा शो की ज्या कार्यक्रमात फक्त बॉलीवुडचे स्टार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. पण नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाची लोकप्रियता पाहता, कॉमेडीचा किंग असलेला कपिल शो याला देखील आपल्या कार्यक्रमात सैराट टिमला बोलविण्याचा मोह आवरला नाही. या शोमध्ये सैराट टीम येणार ही चर्चा प्रेक्षकामध्ये रंगत होती. पण याची झलक पाहण्याची जी प्रेक्षकांच्या उत्सुकता होती ती आता संपली आहे. कारण या कपिलच्या शोचे काय फोटोज सोशलमिडीयावर शेअर करण्यात आले आहे. या फोटोतून असेच वाटते की, कपिलच्या शोमध्ये या टीमने फुल सैराट केलेला दिसत आहे. तसेच कपिलच्या टीमला देखील झिंगाट चढलेली दिसत आहे.