Join us

तेजश्री प्रधान लुटते पावसाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 14:19 IST

पहिल्या पावसात ओलेचिंब भिजण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. पावसाळा कधी सुरू होतो आणि कधी पावसाचा आनंद लुटतो अके काहीसे प्रत्येकालाच ...

पहिल्या पावसात ओलेचिंब भिजण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. पावसाळा कधी सुरू होतो आणि कधी पावसाचा आनंद लुटतो अके काहीसे प्रत्येकालाच वाटत असते. मग यामध्ये मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. अशाच या पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद महाराष्ट्राची लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान हिने लुटला आहे. तेजश्री ही पावसाचा मनमुराद आनंद लुटण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. पावसात ती खेळतानादेखील पाहायला मिळत आहे. अगदी लहान बनून तिने हा पावसाळा एॅन्जॉय केलेला दिसत आहे. या पावसाचा आनंद घेत असतानाचे काही फोटो तिने सोशलमिडीयावर पोस्ट केले आहे. तसेच एकदाचं ग भिजूनि मला चिंब चिंब होऊन दे.. ए मम्मा असं स्टेटस देखील तिने अपडेट केले आहे.