Join us  

अलका कुबल यांनी शेअर केला फॅमिली फोटो, पाहा कोणकोण आहे त्यांच्या कुटुंबात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 7:00 AM

1 / 12
'माहेरची साडी', 'लेक चालली सासरला', 'वहिनीची माया', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' अशा असंख्य चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल.
2 / 12
उत्तम अभिनयशैली, स्वभावातील नम्रपणा आणि साधेपणा यामुळे अलका कुबल यांनी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.
3 / 12
अभिनेत्री अलका कुबल सिनेइंडस्ट्रीप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
4 / 12
अलका कुबल यांनी नुकतेच त्यांच्या जवळच्या नातलगांच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तिथले त्यांनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत त्या त्यांचा नवरा समीर आठल्येंसोबत दिसत आहेत.
5 / 12
त्यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या, त्यांचा नवरा, लेक ईशानी आणि जावई पाहायला मिळत आहे.
6 / 12
याशिवाय त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत त्यांचे भाऊदेखील पाहायला मिळत आहेत. हा फोटो शेअर करत लिहिले की, भाऊ भहिणीचे नाते प्रेमाचे अतूट विश्वासाचे..
7 / 12
यापूर्वीही अलका कुबल यांनी सोशल मीडियावर फॅमिलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
8 / 12
अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत एकीचे नाव आहे ईशानी तर दुसरीचे नाव आहे कस्तुरी. या दोघी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.
9 / 12
ईशानीचं निशांत वालियासोबत नुकतेच लग्न झाले. ती पायलट आहे.
10 / 12
अलका कुबल यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात डर्मेटोलॉजिस्टचे शिक्षण घेते आहे.
11 / 12
अलका कुबल अजूनही कलाविश्वात सक्रीय आहे. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे.
12 / 12
शेवटच्या त्या 'आई माझी काळुबाई' या मालिकेत झळकल्या होत्या. तसेच त्या धुराळा या चित्रपटातही पाहायला मिळाल्या होत्या.
टॅग्स :अलका कुबल