Join us  

'दुनियादारी'चे मेंबर मराठीत घेतात सर्वाधिक मानधन; चॉकलेट बॉय अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:35 PM

1 / 6
मराठीतील चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी हा रिपोर्टनुसार एका सिनेमासाठी जवळपास ५० लाख रुपये चार्ज करतो अशी माहिती आहे. उत्तम अभिनयासोबत स्वप्निल जोशीचे फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 6
मराठी इंडस्ट्रीतील चंद्रमुखी अर्थात अमृता खानविलकर. अमृताला अभिनयासोबतच नृत्याची देखील आवड आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अमृता एका सिनेमासाठी १० ते १२ लाख घेते. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 6
मराठीतील बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सई २० लाख रुपये घेते एका सिनेमासाठी. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 6
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. उर्मिला अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना ही आहे. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. ती एका चित्रपटासाठी ८ लाख रुपये घेते. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 6
महाराष्ट्राची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीला आपण कसं विसरु शकतो. सतत चर्चेत राहणाऱ्या सोनालीचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. सोनाली एका सिनेमासाठी १२ ते १५ लाख रुपये घेत असल्याचं कळतं. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 6
अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. अंकुश २० ते २५ लाख रुपये एका सिनेमासाठी घेतो. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :सई ताम्हणकरस्वप्निल जोशीअमृता खानविलकरसोनाली कुलकर्णीअंकुश चौधरी