Join us  

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा थाटात पार पडला साखरपुडा, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:56 PM

1 / 10
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
भाग्यश्री बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
भाग्यश्री मोटे हिने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.(फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' या चित्रपटात दिसली होती. तिने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
भाग्यश्रीनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. साखरपुड्याचा फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
भाग्यश्रीनं बॉयफ्रेंड विजय पलांडे(Vijay Palande)सोबतचा साखरपुडा शेअर केला आहे. यानंतर त्यादोघांवर अभिनंदनाचा वर्षाव सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
भाग्यश्रीचा होणार पती विजय पलांडे हा हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
भाग्यश्री आणि विजय एकमेकांंना अनेकदिवस डेट करते होते. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर अनेकवेळा शेअर करतात. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :भाग्यश्री मोटेसेलिब्रिटी